BRD SPORTS 2015


WRD SPORTS EVENT HAS BEEN POSTPONED. NEW DATES WILL ANNOUNCED SOON.


प्रास्ताविक

राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन ,प्रचार ,प्रसार व जोपासना करणेसाठी व त्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणेसाठी क्रीडा धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे या धोरणामध्ये क्रीडाविषयक पायाभूत सुविधांची निर्मिती ,खेळाडूचे प्रशिक्षण तसेच विकास या बाबीचा प्रामुख्याने समावेश आहे.
खेळाद्वारे सर्वासाठी सुदृढता या क्रीडा धोरणानुसार राज्याच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आरोग्यसंपन्न मनुष्यबळ प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे परिणाम करत असते. कर्मचाऱ्यांची शारीरिक तंदुरुस्ती व कार्यक्षमता वाढीस लागून उत्पादन वाढणेसाठी शासकीय, निमशासकीय, महामंडळ, सहकारी संस्था ई. ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन जलसंपदा विभाग आपल्या कर्मचाऱ्यांसाठी करत आहे.
जलसंपदा विभागाचे व्हिजन २०२० कार्यशाळेमध्ये जलसंपदा विभागाअंतर्गत क्रीडा सामने तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे अशी आग्रही मागणी करण्यात आली होती. यामुळे जलसंपदा विभागाअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या कला गुणांना वाव मिळेल तसेच एकात्मिक बंधुभाव वाढण्यास मदत होईल.